Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि रयतेचे राजा होते.
1680 मध्ये शिवछत्रपतींचे देहावसान झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी बांधली.
मात्र मधल्या काळात ती विस्मृतीत गेली. कारण नंतरच्या काळात रायगड किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.
10 मे 1818 रोजी इंग्रज सेनापती कर्नल प्रॉथर याने पेशव्यांकडून रायगड ताब्यात घेतला.त्यावेळी त्याला तिथे शिवरायांची समाधी दिसली.
एवढ्या महान राजाच्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्याचे त्याला आश्चर्य वाटले. आपल्या पत्रव्यवहारात त्याने त्याबाबत लिहिले.
हाच शिवरायांच्या समाधीचा पहिला लिखित उल्लेख! 1890च्या दशकात छापण्यात आलेल्या ‘कुलाबा गॅझेटियर’मध्ये ही नोंद करण्यात आली आहे.
रायगडवर महाराजांची समाधी आजही लोकांना प्रेरणा देते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी शिवभक्त येत असतात.
‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी हि माहिती दिली.