Saisimran Ghashi
एक ब्रिटिश अधिकारीच्या घरात त्याचे पाय स्वच्छ करताना आणि वारे घालताना भारतीय नोकर दिसत आहेत.
ब्रिटिश काळात भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय-अत्याचार झाला होता. त्याची काही दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध आहेत.
गरीब अपंग भिकाऱ्याची बैलगाडी आणि मागे उभे असलेले पुरुष हा कोलकात्यातील फोटो आहे.
भारतातील एका गावातील हे दुर्मिळ छायाचित्र आहे. यातून त्याकाळातील दारिद्र,गरीबीचा अंदाज येतो.
हा फोटो १९१९ च्या सुमारास कसूर रेल्वे स्टेशनवर (आता पाकिस्तानमध्ये) काढला गेला होता यामध्ये एका भारतीयाला अर्धनग्न करून मारहाण केली जाता आहे.
१८५८ मध्ये, एका अयशस्वी भारतीय बंडानंतर भारत थेट ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली आले. त्यावेळी त्यांनी बंडातील नेत्यांना फाशी दिली.
सिंहासनावर विराजमान झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या शाही भेटीदरम्यान, भारतातील वाघांच्या शिकारीनंतर झालेल्या दिवसाच्या शिकारीची पाहणी करताना राजा पाचवा जॉर्ज.
स्प्लेनेड मैदानावर राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीवर बंदी घालल्यानंतर मुंबईमध्ये पोलिसांचा भारतीय निदर्शकांशी सामना झाला आणि पोलिसांनी निःशस्त्र काँग्रेस स्वयंसेवकांना, महिलांना आणि मुलांवर लाठीमार केला.
७ मे १९३४ सालामध्ये बंगालचे गव्हर्नर सर जॉन अँडरसन यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंगालींपैकी एकाला घटनेच्या ठिकाणाहून वाहून नेण्यात आले