जुन्या काळातला मेसेज! 'तार' प्रणाली कशी काम करायची?

संतोष कानडे

टेलिफोन येण्यापूर्वी आणि टेलिफोनचा प्रसार होण्यापूर्वी पत्र हे संवादाचं साधन होतं.

पत्रासोबत आणखी एक मेसेज सिस्टीम होती. तातडीचा मेसेज द्यायचा असेल तर या प्रणालीचा वापर होई.

यालाच तार सिस्टीम म्हटलं जात होतं. ही तार आली की लोकांच्या काळजात धस्स होत असे.

बहूतांश वेळा ही तार दुःखद घटना सांगण्यसाठी केली जात होती. त्यामुळे तार येऊ नये, असच सगळ्यांना वाटायचं.

१८५० साली सुरु झालेली तार सेवा २०१३ मध्ये थांबवण्यात आली. तार पाठवण्यासाठी टेलिग्राम मशिनचा वापर व्हायचा.

हे टेलिग्राम मशीन दोन भागांमध्ये विभागलं जायचं. एक रिसिव्ह अँड सेंड मशीन आणि दुसरं मेसेज टाईप मशीन.

हा मेसेज पाठवण्यासाठी एका विशिष्ट कोड लँग्वेजचा वापर होत असे. चिन्हांच्या माध्यमातून मेसेज लिहिला जायचा.

एकदा मेसेज सेंड केला की ज्या पोस्ट ऑफिसमध्ये तो पाठवलाय तिथेही अशाच सांकेतिक भाषेत मेसेज मिळायचा.

असा मेसेज पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी सोयीच्या भाषेत कन्व्हर्ट करायचे आणि पोस्टमनद्वारे पत्त्यावर पाठवायचे.

बाबरबद्दल हे गुपित तुम्हाला माहितंय का?

<strong>येथे क्लिक करा</strong>