तब्बल 1000 वर्षे जुन्या आहेत भारतातल्या या 10 अद्भुत वास्तू, आजही सुंदरता आहे जशीच्या तशी..पाहा फोटो

Saisimran Ghashi

प्राचीन भारतीय वारसा


भारत १,००० वर्षांहून अधिक जुन्या असंख्य स्मारकांसाठी ओळखला जातो. ही स्मारके आजही मजबूत आणि सुंदर आहेत.

Ancient Indian Heritage photos

|

esakal

वास्तुकलेची मजबुती


या इमारती केवळ कला-वास्तुकलेची उदाहरणे नाहीत तर इतिहास आणि संस्कृतीची झलक देतात.

Architectural Strength photos

|

esakal

सौंदर्य अबाधित


१००० वर्षांहून अधिक जुनी असूनही या अद्भुत इमारतींचे सौंदर्य अजूनही कायम आहे.

Unfading Beauty of india photos

|

esakal

ऐतिहासिक महत्त्व


ही नऊ स्मारके भारताच्या प्राचीन वास्तुकलेच्या वैभवाचे आणि टिकाऊपणाचे प्रतीक आहेत.

Historical photos india

|

esakal

सांची स्तूप


तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकाने बांधलेला हा जगातील सर्वात जुन्या बौद्ध स्मारकांपैकी एक आहे. त्याच्या भव्य घुमटात बुद्धांचे अवशेष आहेत आणि चारही बाजूंना उत्कृष्ट दगडी कोरीवकाम व सुंदर कमानी आहेत.

Sanchi Stupa photos

|

esakal

शोर मंदिर, महाबलीपुरम


तामिळनाडूत आठव्या शतकात पल्लव राजा नरसिंहवर्मन दुसरा याने बांधले. हे प्राचीन द्रविड वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून १,००० वर्षांहून अधिक काळ मजबूत उभे आहे.

Shore Temple, Mahabalipuram photos

|

esakal

कैलास मंदिर, वेरूळ


आठव्या शतकात एकाच दगडात वरपासून खालपर्यंत कोरलेले. भगवान शिवाला समर्पित हे मंदिर त्याच्या गूढता आणि कलात्मकतेसाठी जगप्रसिद्ध आहे.

Kailasa Temple, Ellora photos

|

esakal

खजुराहो मंदिर समूह


९५० ते १०५० दरम्यान चंडेला राजवंशाने बांधले. उत्कृष्ट शिल्पकला आणि कारागिरी; देव-देवता, नृत्य आणि जीवनाचे विविध पैलू कलात्मकतेने दर्शविले आहेत.

Khajuraho Temple Complex photos

|

esakal

बाराबार लेण्या, गया


तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत बांधलेल्या. घन ग्रॅनाइटपासून बनवलेल्या या भारतातील सर्वात जुन्या दगडी बांधकामांपैकी एक असून भिंती आरशासारख्या चमकतात.

Barabar Caves photos

|

esakal

बृहदेश्वर मंदिर, तामिळनाडू


इ.स. १०१० मध्ये राजराज चोल प्रथम यांनी बांधले. पूर्णपणे ग्रॅनाइटचे; २०० फूट उंच, भगवान शिवाला समर्पित आणि ८० टन वजनाच्या अखंड दगडाने सजलेले.

Brihadeeswarar Temple, Tamil Nadu photos

|

esakal

लिंगराज मंदिर, भूवनेश्वर


११ व्या शतकात बांधलेले. कलिंग शैलीत; भगवान शिवाला समर्पित, १८० फूट उंच आणि भोवती अनेक लहान मंदिरे आहेत.

Lingaraj Temple photos

|

esakal

कोणार्क सूर्य मंदिर


१२५० मध्ये पूर्व गंगा राजवंशातील राजा नरसिंह देव प्रथम यांनी बांधले. सूर्य देवाला समर्पित; सात घोडे आणि २४ चाके असलेल्या भव्य रथाच्या आकाराचे.

Konark Sun Temple photos

|

esakal

विरुपाक्ष मंदिर, हंपी


सातव्या शतकात बांधले. भगवान शिवाला समर्पित; हंपीतील सर्वात जुनी वास्तू. उंच गोपुरम, गुंतागुंतीचे कोरीव खांब आणि भित्तीचित्रे विजयनगर साम्राज्याच्या समृद्धीचे प्रतिबिंबित करतात.

Virupaksha Temple, Hampi photos

|

esakal

जगातल्या सर्वांत पहिल्या अन् दुर्मिळ वस्तू पाहिल्यात का? फक्त 100 नाही 10000 वर्षे जुने..एकदा पाहाच

world's rarest artifacts

|

esakal

येथे क्लिक करा