Saisimran Ghashi
200 वर्षांपूर्वी (इ.स. 1810 च्या सुमारास) ब्रिटिशकालीन मुंबईतील वाहतूक व्यवस्था प्रामुख्याने साध्या आणि स्थानिक साधनांवर अवलंबून होती.
आम्ही या काळातील वाहतुकीच्या साधनांचे वर्णन, ब्रिटिश लायब्ररीतील चित्रांच्या संदर्भासह माहिती देणार आहोत
बैलगाड्या ह्या मुंबईतील मालवाहतुकीसाठी विशेषतः ग्रामीण भागातून शहरात प्रवासासाठी वापरल्या जात. ब्रिटिश लायब्ररीतील चित्रांमध्ये अशा गाड्यांचे रेखाचित्र आहे.
शहरी भागात उच्चवर्गीय आणि ब्रिटिश अधिकारी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या गाड्यांचा वापर करत.
धनाढ्य आणि स्थानिक श्रीमंत व्यक्तींसाठी पालखी ही मानवी वाहकांद्वारे वाहतुकीचे साधन होती.
मुंबईच्या बंदरातून बोटी आणि लहान जहाजांद्वारे माल आणि प्रवासी वाहतूक होत असे.
ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी बग्गी असे तसेच लाकडी चाकांची गाडी असे.
हातगाडी ज्याला हाकरी देखील म्हणतात. ही गाडी एक व्यक्ती खांद्यावर ओढत घेऊन जात असे आणि मागे लोक बसत किंवा वस्तु असत.