Saisimran Ghashi
भारत- पाकिस्तान 1947 फाळणीत वेगळे झाले पण 60-70 दशकात पाकिस्तान कसे होते माहितीये?
१९६०-७० च्या काळात पाकिस्तानमध्ये लोक मोकळेपणाने, आनंदाने आणि निर्भयपणे जगत होते.
त्या काळात लोक पँट-शर्ट घालायचे, महिला साडीत फिरायच्या, आणि विदेशी लोक सहज मिसळायचे.
समाज अधिक उदारमतवादी होता, धार्मिक किंवा सामाजिक बंधनांपेक्षा वैयक्तिक स्वातंत्र्य महत्त्वाचं होतं.
पूर्वीचा मॅकलिओड रोड, जो आता इब्राहिम इस्माईल चुंद्रीगर रोड म्हणून ओळखला जातो, त्या काळच्या विकासाचं प्रतीक होता.
बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक स्थळं उत्साही लोकांनी भरलेली असायची, जीवनात उत्सव होता.
लोकांना त्यांच्या आवडीनुसार जीवन जगण्याचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य होतं.
८० च्या दशकात झुल्फिकार अली भुट्टो आणि झिया-उल-हक यांच्या काळात 'इस्लामीकरण' सुरू झालं आणि सगळं बदलू लागलं.
आजचा कराची याच्या पूर्ण विरुद्ध झाले आहे, पण ६०-७० चं कराची एक सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाने भरलेलं स्वप्नवत शहर होतं.