Saisimran Ghashi
इंग्लंड हे औद्योगिक क्रांतीचे केंद्र होते. मशीन, फॅक्टरीज, रेल्वे, आणि शहरांची झपाट्याने वाढ झाली.
ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार सुरू होता आणि "सूर्य न मावळणारे साम्राज्य" अशी ओळख मिळवली होती.
अमेरिका 1776 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर 1800 च्या दशकात पश्चिमेकडे विस्तार करत होती (Westward Expansion), ज्यामुळे मूळ अमेरिकी जमातींवर परिणाम झाला.
उत्तर अमेरिकेत विशेषतः उत्तर भागात यंत्रांनी चालणाऱ्या कारखान्यांची वाढ झाली, आणि अमेरिकेने औद्योगिक क्रांतीकडे पावले टाकली.
चीनमध्ये किंग (Qing) राजवंश सत्ता सांभाळत होता, पण प्रशासन कमजोर होत चाललं होतं.
ब्रिटनसोबत झालेल्या ओपियम युद्धांमुळे चीनला अनेक अपमानजनक करार करावे लागले आणि परकीय शक्तींचा प्रभाव वाढला.
भारतावर इंग्रजांचे नियंत्रण वाढत चालले होते आणि 1857 पर्यंत बहुतेक भाग त्यांच्याच ताब्यात गेला होता.
अनेक लहानमोठे उठाव होत होते. समाजात आणि राजकारणात इंग्रजांविरोधात नाराजी वाढत होती.
जपानमध्ये टोकोगावा शोगुनांचे नियंत्रण होते, जे देशाला परदेशी संपर्कांपासून वेगळं ठेवत होते
अंतर्गत युद्धं थांबवून एक सुसंघटित व शांत समाज निर्माण करण्यात आला होता, जरी आधुनिकतेपासून दूर होता.