Aarti Badade
मोबाईल आणि इंटरनेट नसलेल्या काळात पोस्ट ऑफिस हे दूरच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आणि खुशाली कळवण्याचे महत्त्वाचे ठिकाण होते.
Old Post Office photo
Sakal
ब्रिटिशकालीन दगडी किंवा कौलारू इमारतींमध्ये पोस्ट ऑफिस असायचे आणि बाहेर लाल रंगाची पत्रपेटी लक्ष वेधून घ्यायची.
Old Post Office photo
Sakal
पोस्ट ऑफिसमध्ये पिवळी पोस्टकार्ड्स, निळी आंतरदेशीय पत्रे, खाकी लिफाफे, शाईच्या बाटल्या आणि स्टॅम्प पॅड दिसायचे.
Old Post Office photo
sakal
संगणक नसल्यामुळे कर्मचारी प्रत्येक पत्रावर तारखेचा शिक्का हाताने मारायचे, तर नोंदी मोठ्या रजिस्टरमध्ये लिहिल्या जायच्या.
Old Post Office photo
Sakal
खाकी गणवेश, टोपी आणि खांद्यावर पत्रांची पिशवी घेऊन सायकलवर येणारा पोस्टमन गावातील प्रत्येकाच्या परिचयाचा असायचा.
Old Post Office photo
Sakal
अनेकांना पत्र वाचता येत नसल्याने पोस्टमन ते वाचून दाखवायचा, तर मनीऑर्डरमधून दूरच्या नातेवाईकांना पैसे पाठवले जायचे.
Old Post Office photo
Sakal
तातडीचा संदेश पाठवण्यासाठी तारसेवेचा वापर व्हायचा आणि पोस्ट ऑफिसमधून आलेल्या प्रत्येक पत्राची लोक आतुरतेने वाट पाहायचे.
Old Post Office photo
Sakal
sinhagad fort or lohagad fort which is better
esakal