Saisimran Ghashi
भारतातील काही असे दुर्मिळ फोटो आहेत जे हल्ली आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा आपण ते पाहायची तसदी घेत नाही.
हे जुने फोटो आपल्याला जुन्या काळातील भारताचे रोमांचकारक दर्शन घडवतात.
1954 मधील कुंभमेळ्याची झलक दाखवणारे हे दुर्मिळ छायाचित्रे आहे.
अण्णा हजारे 1960 सालामध्ये भारतीय सैन्यात होते. त्यांच्या कार्यकाळातील हा दुर्मिळ फोटो.
भारतीय महिला विद्यापीठ, 1921 मधून पदवीधर झालेल्या महिलांची पहिली तुकडी.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अखेरच्या वेळी इंग्रजांनी पकडले होते त्यावेळीचे हे छायाचित्र आहे.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ताजमहाल ज्यूटने झाकलेला होता.
1886 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पहिला इंग्लंड दौरा केला.
1845 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने अर्ध्या आण्याचे नाणे छापले होते.
1940 च्या दशकात चेन्नईमध्ये भारतीय रुग्णवाहिका अशा होत्या .