IPL मधील सर्व १० फ्रँचायझींचे सर्वात वयस्कर खेळाडू कोण?

Pranali Kodre

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचे वयस्कर खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंसोबतच काही अनुभवी खेळाडूही खेळतात. पण प्रत्येक संघाकडून खेळलेला वयस्कर खेळाडू कोण, हे आपण जाणून घेऊ.

MS Dhoni

|

Sakal

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळलेला सर्वात वयस्कर खेळाडू ब्रॅड हॉज आहे, त्याने जेव्हा शेवटचा आयपीएल सामना खेळला तेव्हा त्याचे वय ४५ वर्षे ९२ दिवस होते.

Brad Hogg

|

Sakal

चेन्नई सुपर किंग्स

माजी कर्णधार एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात वयस्कर खेळाडू असून २०२५ मध्ये जेव्हा त्याने शेवटचा सामना खेळला तेव्हा त्याचे वय ४३ वर्षे ३२२ दिवस होते.

MS Dhoni

|

Sakal

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात वयस्कर खेळाडू प्रवीण तांबे होता, त्याने शेवटचा सामना खेळला, तेव्हा त्याचे वय ४३ वर्षे २१४ दिवस होते.

Pravin Tambe

|

Sakal

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मुथय्या मुरलीधरन सर्वात वयस्कर खेळाडू होता. त्याने शेवटचा सामना या संघासाठी खेळला,तेव्हा त्याचे वय ४२ वर्षे३५ दिवस होते.

Muttiah Muralitharan

|

Sakal

पंजाब किंग्स

ख्रिस गेल हा पंजाब किंग्सचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, तो जेव्हा या संघासाठी अखेरचा खेळला, तेव्हा त्याचे वय ४२ वर्षे ७ दिवस होते.

Chris Gayle

|

Sakal

लखनौ सुपर जायंट्स

लखनौ सुपर जायंट्स संघासाठी सर्वात वयस्कर खेळाडू अमित मिश्रा आहे, तो या संघासाठी शेवटचा खेळला, तेव्हा त्याचे वय ४१ वर्षे १५५ दिवस होते.

Amit Mishra

|

Sakal

दिल्ली कॅपिटल्स

फाफ डू प्लेसिस दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, ज्याने या संघासाठी ४० वर्षे ३१५ दिवस वय असताना शेवटचा सामना खेळला.

Faf du Plessis

|

Sakal

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सचा सर्वात वयस्कर खेळाडू सनथ जयसूर्या आहे. त्याने ४० वर्षे २८५ दिवस वय असताना मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळला.

Sanath Jayasuriya

|

Sakal

गुजरात टायटन्स

वृद्धिमान साहा गुजरात टायटन्सचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याने ३९ वर्षे १९३ दिवस वय असताना या संघाकडून शेवटचा सामना खेळला.

Wriddhiman Saha

|

Sakal

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादसाठी आशिष नेहरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याने ३८ वर्षे ७ दिवस वय असताना या संघासाठी शेवटचा सामना खेळला.

Ashish Nehra

|

Sakal

IPL मधील सर्व १० फ्रँचायझींचे सर्वात युवा खेळाडू कोण?

Youngest Debutants in Every IPL Franchise

|

Sakal

येथे क्लिक करा