IPL मध्ये डावात ५ विकेट्स घेणारे सर्वात वयस्कर गोलंदाज

Pranali Kodre

IPL 2025

इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये (IPL 2025) ३० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला.

Pat Cummins - Mitchell Starc | Sakal

दिल्लीचा विजय

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सने सहज विजय मिळवला. या विजयात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोलाचा वाटा उचलला.

Mitchell Starc | Sakal

मिचेल स्टार्कच्या ५ विकेट्स

स्टार्कने ३.४ षटकात ३५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याने या ५ विकेट्स घेतल्या त्यावेळी त्याचे वय ३५ वर्षे ५९ दिवस इतके होते.

Mitchell Starc | Sakal

दुसरा वयस्कर खेळाडू

त्यामुळे तो आयपीएलमध्ये एका डावात ५ विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

Mitchell Starc | Sakal

तिसरा क्रमांक

या यादीत त्याने मोहित शर्माला मागे टाकले आहे. मोहितने ३४ वर्षे २५० दिवस वय असताना २०२३ आयपीएलमध्ये अहमदाबादमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या.

Mohit Sharma | Sakal

चौथा क्रमांक

या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर दिमित्री मस्करेन्हास असून त्याने मोहालीत २०१२ आयपीएलमध्ये ३४ वर्षे १६५ वय असताना ५ विकेट्स घेतल्या होत्या.

Dimitri Mascarenhas | Sakal

पहिला क्रमांक

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर अनिल कुंबळे असून त्याने २००९ आयपीएलमध्ये ३८ वर्षे १८३ दिवस वय असताना ५ विकेट्स घेतल्या होत्या.

Anil Kumble | Sakal

RR vs CSK सामन्याआधी गुवाहाटीत साराचा डान्स, पण चर्चा रियान परागची; पण का?

Sara Ali Khan’s Performance, But Why is Riyan Parag Trending | Sakal
येथे क्लिक करा