Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १८ व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या १८ व्या हंगामातील सामने एकूण १३ स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
दरम्यान, २२ मार्च रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा दणक्यात पार पडला होता.
पण, त्यावरच बीसीसीआय थांबलेले नाहीत. यंदा प्रत्येक स्टेडियमवर एकदा खास सोहळे होणार आहेत. १३ शहरातील या सोहळ्यांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सचा परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.
३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर झाला.
या सामन्याआधीही या स्टेडियमवर रंगतदार सोहळा पाहायला मिळाला. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा खास परफॉर्मन्स पाहायला मिळाला.
पण तिच्या परफॉर्मन्समुळे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि गुवाहाटीचा लोकल बॉय रियान पराग मात्र चर्चेत आला.
यामागे कारण म्हणजे गेल्यावर्षी आयपीएल २०२४ नंतर रियान परागच्या युट्युबवरील सर्च हिस्ट्री तो त्याच्या गेमिंग चॅनेलवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना लीक झाली होती.
त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचीही नावं होती, ज्यापुढे हॉट असं लिहिलेलं असल्याने बरीच चर्चा झाली होती. याच घटनेच्या पार्श्वभूमीमुळे रियान पराग चर्चेत आला.