कोकणची अस्सल चव! अशी बनवा पारंपारिक'ओल्या काजूची भाजी'!

Aarti Badade

कोकणी मेजवानी

फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोकणात मिळणाऱ्या ओल्या काजूगरांची भाजी (उसळ) ही खवय्यांसाठी एक पर्वणीच असते.

मुख्य साहित्य

यासाठी तुम्हाला हवे आहेत २ कप सोललेले ओले काजूगर, भाजलेलं खोबरं-कांद्याचं वाटण आणि झणझणीत मालवणी मसाला.

Olya Kajuchi Bhaji

|

Sakal

काजूगरांची तयारी

सर्वात आधी ओले काजूगर सोलून घ्या; जर ते थोडे कडक असतील तर २-३ तास पाण्यात भिजत ठेवा जेणेकरून ते छान मऊ होतील.

Olya Kajuchi Bhaji

|

Sakal

फोडणी आणि मसाला

कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कांद्याची फोडणी द्या. त्यात हळद आणि मालवणी मसाला घालून खमंग परतून घ्या.

Olya Kajuchi Bhaji

|

Sakal

वाटण आणि शिजवणे

आता यात भिजवलेले काजूगर आणि तयार केलेले खोबऱ्याचे वाटण घाला. गरजेनुसार गरम पाणी घालून सर्व जिन्नस एकत्र करा.

Olya Kajuchi Bhaji

|

Sakal

मंद आचेवर वाफ काढा

चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवा आणि काजू पूर्णपणे मऊ होईपर्यंत (सुमारे १५-२० मिनिटे) मंद आचेवर छान शिजवून घ्या.

Olya Kajuchi Bhaji

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. ही चविष्ट भाजी तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता.

Olya Kajuchi Bhaji

|

Sakal

भाजीला हवाय पर्याय? मग असे बनवा कमी तेलात पौष्टिक सुरणाचे काप!

Suranache Kaap recipe

|

sakal

येथे क्लिक करा