Monika Shinde
सोलापूरपासून फक्त ३० किमी अंतरावर एक अध्यात्मिक आणि शांत ठिकाण म्हणजे अक्कलकोट.
सोलापूर हे लहान-मोठ्या उद्योगधंद्यांसाठी ओळखले जाते. येथे खाण्यापिण्याची चवदार ठिकाणं आणि देवदर्शनासाठी अनेक मंदिरं आहेत.
सोलापूरपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर वसलेलं अक्कलकोट गाव म्हणजे एक शांत, पवित्र आणि भक्तिपूर्ण ठिकाण आहे
अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे कर्मभूमीस्थान आहे. इथे येणाऱ्या भक्तांना दिव्य शांतता आणि श्रद्धेचा अनुभव मिळतो.
प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात. या दिवशी मंदिर परिसर भक्तिभावाने गजबजलेला असतो.
अक्कलकोट हे एक दिवसात जाऊन येण्यासारखं ठिकाण आहे.
अक्कलकोट परिसरात आणखीही काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत, जसे की वटवृक्ष, पादुका मंदिर आणि स्वामी समर्थ समाधीस्थान.
तसेच अक्कलकोट पासून १०- १५ किमीवर गौडगाव यागावी नवसाला पावणारा हनुमान मंदिर देखील आहे.
सोलापूरहून अक्कलकोटला बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने सहज पोहोचता येते. प्रवास सुमारे ३० किमीचा असून रस्ता सुटसुटीत आणि आरामदायक आहे.