सकाळ डिजिटल टीम
भारतात एक घर असं आहे ज्या घराचा दरवाजा एका राज्यात उघडतो तर खिडकी दुसऱ्या राज्यात. राजस्थान आणि हरियाणाच्या सीमेवर हे घर आहे.
राजस्थानच्या अलवरमधील भिवाडा इथं हे घर असून या घरात दोन कुटुंबं राहतात. दोन राज्यांमध्ये हे घर उभारलं आहे.
कृष्ण दायमा हे हरियाणाच्या धारूहेडातून दोन वेळा नगरसेवक होते. तर त्यांचा पुतण्या हवासिंह हा राजस्थानच्या भिवाडीमध्ये तिसऱ्यांदा नगरसेवक बनलाय.
दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या या घरात राजस्थानमधून पाणी तर हरियाणातून वीज मिळते. या घराचे पत्तेही वेगवेगळे आहेत.
घराला दोन्ही बाजूला गेट असून एक गेट हरियाणात उघडतं तर दुसरं गेट राजस्थानमध्ये आहे.
नगरसेवक कृष्ण दायमा सांगतात की गेल्या अनेक पिढ्यांपासून दोन्ही कुटुंब या घरात राहतात. सध्या १० पेक्षा जास्त सदस्य घरात आहेत.
एक घर दोन राज्यात असल्याचं आता या कुटुंबासाठी सामान्य बाब आहे. पण इतरांना जेव्हा हे समजतं त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो.