Aarti Badade
जायफळ थेट वजन कमी करत नसले तरी, ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
जायफळ ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफीमध्ये टाकल्याने चयापचय वाढतो आणि त्यामुळे चरबी जलद वितळते.
जायफळ पचनासाठी उपयुक्त आहे. चांगले पचन हे वजन कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
जायफळामध्ये असलेले फायबर पोट भरल्याची भावना निर्माण करते आणि वारंवार खाण्याची सवय कमी होते.
जायफळामध्ये मॅंगनीजसारखे खनिज असतात, जे चरबी तोडण्यास मदत करतात आणि शरीर सडपातळ राहते.
रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर जायफळ घालून प्यायल्याने झोप सुधारते, आणि झोपेचा अभाव टाळल्यामुळे वजन वाढत नाही.
जायफळ शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि शरीर निरोगी बनते.
जायफळाचा प्रभाव अनुभवायचा असेल, तर आहारातून जंक फूड, गोड व तळलेले पदार्थ टाळा.
सकाळच्या नाश्त्यात थोडेसे जायफळ वापरल्यास त्याचा प्रभाव दिवसभर टिकतो आणि ऊर्जा मिळते.