'फेसवॉश'ऐवजी साबण वापरल्यास काय दुष्परिणाम होतात?

संतोष कानडे

फेसवॉश

अनेकजण चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशऐवजी आंघोळीचा साबण वापरतात; मात्र यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

साबण

सामान्य साबणाचा पीएच अनेकदा चेहऱ्याच्या नैसर्गिक त्वचेच्या पीएच पेक्षा जास्त असतो.

नैसर्गिक ओलावा

त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते.

जळजळ

काही लोकांना चेहऱ्यावर खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवू शकतो.

नैसर्गिक थर

साबणाच्या अतिवापरामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षणात्मक थर कमकुवत होऊ शकतो.

त्वचा

संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होऊ शकतो.

सोलवटणे

कोरड्या त्वचेवर ताणल्यासारखे वाटणे आणि त्वचा सोलवटणे अशा समस्या उद्भवू शकतात.

क्लिन्झर

त्यामुळे चेहऱ्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य आणि योग्य क्लिन्झर किंवा फेसवॉश निवडणे चांगले.

मॉइश्चरायझिंग साबण

प्रत्येक साबण वाईट नसतो; चेहऱ्यासाठी तयार केलेला सौम्य, मॉइश्चरायझिंग साबणही वापरता येऊ शकतो.

वाघ दिवसातून किती तास झोपतो?

<strong>येथे क्लिक करा</strong>