Aarti Badade
कांद्याचा रस आणि तेल दोन्हीमध्ये केसांना वाढीसाठी उपयुक्त सल्फर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.
कांद्याच्या रसात थेट ताज्या कांद्यामधून मिळणारे घटक अधिक प्रभावी असतात. कांद्याचे तेल बहुतेकदा dilute केल्याने त्याचे प्रभाव थोडे सौम्य असतात.
कांद्याचा रस त्वचेत लवकर शोषला जातो आणि मुळांपर्यंत पोहोचतो. तेल हळूहळू शोषले जाते, पण टाळूवर जास्त वेळ टिकते.
रस: आठवड्यातून २-३ वेळा वापरणे योग्य – वास आणि जळजळ टाळण्यासाठी. तेल: रोज किंवा वारंवार लावता येते, रात्रभर ठेवता येते.
कांद्याचा रस ताजा करावा लागतो, टिकत नाही आणि वापरायला त्रासदायक होतो. तेल रेडी-टू-यूज असतं, आणि स्टोरेज फ्रेंडली असतं.
कांद्याच्या रसाचा वास तीव्र, आणि संवेदनशील त्वचेसाठी जळजळ निर्माण करणारा. कांद्याचे तेल सौम्य वासाचे, आणि सौम्य परिणाम देणारे असते.
जलद परिणाम हवाय? कांद्याचा रस वापरा. सुविधा आणि दीर्घकालीन पोषण हवंय? कांद्याचे तेल उत्तम पर्याय!