सकाळ वृत्तसेवा
1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली, पण या ऐतिहासिक निर्णयाची माहिती देशात फक्त ६ जणांनाच होती!
1962 मध्ये चीनकडून पराभव आणि 1965-71 च्या पाकिस्तान युद्धानंतर भारताला अणुशक्तीची गरज वाटू लागली.
1945 पासून होमी भाभा यांच्या पुढाकारातून भारतात अणुऊर्जेचा पाया रचला गेला. पुढे डॉ. राजा रामण्णा आणि होमी सेठना यांनी नेतृत्व घेतलं.
पंतप्रधान इंदिरा गांधी, पी.एन. हक्सर, पी.एन. धर, डॉ. नाग चौधरी, डॉ. सेठना, आणि डॉ. रामण्णा — हीच मंडळी या गुप्त योजनेत सहभागी होती.
राजस्थानमधील दूरस्थ वाळवंटी पोखरण, मानवी वस्तीपासून दूर आणि लष्करी नियंत्रणाखाली असल्याने चाचणीसाठी निवडण्यात आली.
विहिरीत पाणी लागल्यामुळे दुसरं ठिकाण शोधलं जात असताना एका ग्रामस्थाने जुनी कोरडी विहीर दाखवली – तेच ठिकाण निवडलं गेलं!
L आकाराचा खड्डा, 20 किलो युरेनियम आणि बॉम्ब — सगळं गुप्ततेत पूर्ण झालं.
डॉ. दस्तगीर यांनी ट्रीगर्स दाबले आणि 6 सेकंदात स्फोट झाला. जमिनीखाली टेकडीसारखा वाळूचा ढिगारा तयार झाला.
जगभरातून भारताच्या धाडसाचं कौतुक झालं, पण अमेरिका आणि इतर देशांनी निर्बंध लावले.