Shubham Banubakode
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली आहे. पण तो एकदिवसीय सामने खेळणार आहे.
विराटच्या निवृत्तीनंतर आता सचिन तेंडुलकरचे काही विक्रमही अबाधित राहणार आहे.
कारण विराट एकदिवसीय क्रिकेट खेळणार असला, तरी त्याला सचिनचे विक्रम मोडणं शक्य नाही.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकार सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहेत. सचिनने एकूण ३४,३५७, तर विराटने २७,२१२ धावा केल्या आहेत.
क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकंही सचिनच्या नावे आहेत. सचिनने एकूण १०० शतकं झळकावली आहेत, तर विराटने एकूण ८१ शतकं लगावली आहेत.
सचिनचा सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा विक्रमही अबाधित राहणार आहे. सचिनने १६४, तर विराट १४१ अर्धशतकं लगावली आहेत.
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहे. सचिनने ७६ वेळा तर विराटला ६७ वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.