kimaya narayan
बॉलिवूडमधील गाजलेला एक क्लासिक सिनेमा म्हणजे शोले. हा सिनेमा आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
शोलेमधील मुख्य भूमिकांपासून छोट्यातील छोट्या भूमिका खूप गाजल्या. याशिवाय काही आयकॉनिक सीन्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात जय ही भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका खूप गाजली.
तर जया यांनी या सिनेमात राधा ठाकूरच्या विधवा सुनेची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे जया त्यावेळी गरोदर होत्या. त्यामुळे त्यांचे सीनही फार कमी ठेवण्यात आले होते.
या सिनेमात जय आणि राधा यांची अबोल प्रेमकथा दाखवण्यात आली. यातील त्यांचा रात्रीचा दिव्यांचा सीन खूप गाजला. जिथे राधा संध्याकाळचे दिवे लावत असते आणि जय हार्मोनिका वाजवत तिला पाहत असतो.
पण तुम्हाला माहितीये का ? हा एक मिनिटभराचा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शक आणि कॅमेरामनला एक दोन तास नाही तर वीस दिवस लागले होते.
कारण
वीस दिवस लागण्याचं कारण म्हणजे कॅमेरामन द्वारका व्दिवेचा यांना हा सीन सूर्यास्त आणि रात्र यांच्यामध्ये फक्त काही काळ असलेल्या सोनेरी प्रकाशात शूट करायचा होता. हा सीन खूप गाजला.
तुम्हाला माहितीये का ? सिनेमात जय शेवटी मरणार नव्हता. जय-वीरूला लबाडच दाखवलं जाणार होतं पण नायकांची प्रतिमा चांगली राहावी म्हणून जयचा मृत्यू दाखवण्यात आला.
या सिनेमात जय आणि राधाचंही लग्न व्हावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती जी अखेर अपुरीच राहिली.