Apurva Kulkarni
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर देत 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलय.'
परंतु तुम्हा ऑपरेशन सिंदूरचा अर्थ काय? हे माहिती आहे का? तर जाणून घेऊया..
पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी या मृतदेहाजवर बसल्या होत्या. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्या पार्श्वभूमीवर भारताने या ऑपरेशनचं नाव 'ऑपरेशन सिंदूर' असं दिलं, आणि पाकिस्तावर हवाई दलाकडून कारवाई करण्यात आली.
या नावामागचा खरा अर्थ पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला असा आहे.
पहलगाम हल्ल्यात सगळ्या कर्त्या पुरुषांना मारण्यात आलं होतं. त्यामुळे भारताने जाणीवपूर्वक 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव दिलय.
तिन्ही संरक्षण दलांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवलं आहे.
भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तान आणि पीओकेवरील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.