संतोष कानडे
जम्मू-काश्मरमधल्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेमध्ये २७ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला भारताने बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं. पीओकेमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर भारताने ९ मिसाईल हल्ले केले.
ऑपरेशन सिंदूरसाठी फ्रान्सकडून खरेदी केलेल्या खास राफेल विमानांचा वापर करण्यात आला. या विमानांमधून स्कॅल्प क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
राफेल विमानाने शत्रूंच्या घरात घुसून कहर केला. स्टॉर्म शॅडो किंवा स्कॅल्प हे शस्त्र केवळ लढाऊ विमानांमधून डागलं जाऊ शकतं.
मिसाईल डागण्यासाठी राफेल विमान सर्वात योग्य वाहक असतं. स्कॅल्प हे एक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
युरोपिन संरक्षण कंपनी एमबीडीएने हे बनवलेलं आहे. स्कॅल्प हे भारताच्या ३६ राफेल विमानांचा एक भाग आहे.
राफेलचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं. विमानात असलेल्या स्कॅल्प क्षेपणास्त्राच्या प्रहारामुळे शत्रूचं तळ नेस्तनाभू होतं.
ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यामध्ये या जोडीने कमाल कामगिरी बजावली. स्कॅल्प क्षेपणास्त्राचं वजन १३०० किलो आहे. त्यात ४०० किलोपर्यंत स्फोटकं वाहून नेता येतात.
लढाऊ विमानांमध्ये राफेल हे सर्वोत्तम समजलं जातं. त्याला ओमनिरोल म्हटलं जातं. ओमनिरोल म्हणजे सर्वव्यापी-सर्व बाजूंनी सक्षम.
राफेल विमान हे हवेतून हवेत युद्ध करु शकतं, हवेतून बॉम्ब वर्षाव करु शकतं, हवेतून जमिनीवर मारा करु शकतं. त्यामुळे जागतिक स्तरावर सर्वाधिक सक्षम म्हणून त्याकडे बघितलं जातं.