भारतात लाँच झाला ओप्पोचा स्टायलिश फोन; पाहा किंमत अन् फीचर्स

Sudesh

ओप्पो

ओप्पोने भारतात आपला नवीन स्टायलिश स्मार्टफोन लाँच केला आहे. OPPO F25 Pro 5G असं या फोनचं नाव आहे.

oppo f25 pro 5g | eSakal

डिस्प्ले

यामध्ये 6.7 इंच मोठा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामध्ये पांडा ग्लास प्रोटेक्शनही मिळतं.

oppo f25 pro 5g | eSakal

कॅमेरा

या फोनचा कॅमेरा हा चर्चेचा विषय आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील मुख्य कॅमेरा 64MP क्षमतेचा OmniVision OV64B सेन्सर असलेला आहे.

oppo f25 pro 5g | eSakal

कॅमेरा

यामध्ये 8MP Sony IMX355 सेन्सरची वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरही देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

oppo f25 pro 5g | eSakal

प्रोसेसर

यामध्ये MediaTek Dimensity 7050 SoC चिपसेट दिला आहे. तसंच यात अँड्रॉईड 14 वर आधारित ColorOS 14 देण्यात आली आहे.

oppo f25 pro 5g | eSakal

बॅटरी

या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली आहे, जी 67W चार्जिंगला सपोर्ट करते. तसंच या फोनला IP65 वॉटर रेझिस्टंट रेटिंग मिळाली आहे.

oppo f25 pro 5g | eSakal

किंमत

या फोनच्या 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 25,999 रुपये आहे.

oppo f25 pro 5g | eSakal

ऑफर्स

फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि ओप्पो वेबसाईटवरुन याचं बुकिंग सुरू झालं आहे. यावर 2,000 रुपयांपर्यंत कार्ड डिस्काउंट देण्यात येत आहे.

oppo f25 pro 5g | eSakal

सॅमसंगचं नवं फिटनेस ट्रॅकर लाँच, किती आहे किंमत?

Samsung Galaxy Fit 3 | eSakal