सकाळ डिजिटल टीम
तोंडाचा कर्करोग अत्यंत घातक असून, दरवर्षी लाखो लोक यामुळे मृत्यूमुखी पडतात. 77,000 रुग्ण या कर्करोगामुळे दरवर्षी प्रभावित होतात.
तोंडाचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता येतो आणि त्यावर उपचार सुरू करता येतात. प्रारंभिक लक्षणे ओळखल्यास उपचार सहजपणे करू शकतात.
लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचू शकतो. त्यामुळे वेळेत उपचार महत्त्वाचे आहेत.
तोंडाच्या कर्करोगामुळे बचाव करण्यासाठी धूम्रपान बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.
तोंडात पांढरे-लालसर पुरळ, फोड, तोंड उघडण्यात अडचण, जीभ बाहेर काढताना त्रास आणि आवाजात बदल या लक्षणांवर लक्ष ठेवा.
तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करा. काही बदल दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वरील लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या