Yashwant Kshirsagar
चंद्र मोहन जैन हे ओशो यांचे मूळ नाव. ११ डिसेंबर १९३१ रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे त्यांचा जन्म झाला. आजही अनुयायी या दिवस ‘मुक्ती दिवस’ किंवा ‘मोक्ष दिवस’ म्हणून पाळतात.
Osho Rajneeshpuram USA
esakal
प्रत्येक विषयावर मोकळेपणाने मत मांडल्यामुळे ओशो अनेकदा वादात सापडत. काहींना ते ‘सेक्स गुरू’ वाटत, तर काहींना सच्चे आध्यात्मिक गुरू. त्यांच्या ज्ञाना आणि वक्तृत्वाने देश-विदेशात मोहिनी घातली.
Osho Rajneeshpuram USA
esakal
ओशो १९७४ मध्ये अनुयायांसह पुण्यात आले आणि ‘श्री रजनीश आश्रम’ स्थापन केला. येथूनच त्यांच्या विचारांचा खरा विस्तार झाला. अनेक नामवंत आणि चित्रपट अभिनेते आकर्षित झाले.
Osho Rajneeshpuram USA
esakal
१९८० च्या दशकात भारतीय प्रसारमाध्यमे आणि सरकारने टीका सुरू केली. परिणामी ओशो यांना पुण्यातील आश्रम बंद करावा लागला. यानंतर ते अमेरिकेकडे वळले.
Osho Rajneeshpuram USA
esakal
ओरेगॉनमधील ‘बिग मडी रँच’ या ६५,००० एकर उजाड जमिनीवर ओशो यांनी रजनीशपुरम वसवले. अवघ्या तीन वर्षांत ही ओसाड भूमी एका पूर्ण विकसित शहरात रूपांतरित झाली.
Osho Rajneeshpuram USA
esakal
ब्रिटीश मानसशास्त्रज्ञ गॅरेट म्हणतात, “हे ठिकाण एखाद्या स्वप्नासारखे होते.हास्य, लैंगिक स्वातंत्र्य, प्रेम आणि सर्व प्रकारचे स्वातंत्र्य येथे अस्तित्वात होते.” अनुयायी तेथे भगवान रजनीश म्हणून ओळखत.
Osho Rajneeshpuram USA
esakal
शहरात अग्निशमन दल, रेस्टॉरंट्स, पोलीस स्टेशन, शॉपिंग मॉल, ग्रीनहाऊस, कम्युनिटी हॉल आणि स्वतःचे विमानतळही होते. शेतीपासून आधुनिक जीवनशैलीपर्यंत सर्व काही चालत होते.
Osho Rajneeshpuram USA
esakal
अनुयायांनी शहराची अधिकृत नोंदणी करण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. वाढती संख्या ओरेगॉन सरकारला धोका वाटू लागली.
Osho Rajneeshpuram USA
esakal
इमिग्रेशन उल्लंघन, फसवणूक, वायरटॅपिंग, निवडणुकीत हस्तक्षेप आणि दहशतवाद यासारखे आरोप ठेवण्यात आले. ऑक्टोबर १९८५ मध्ये ३५ आरोपांखाली अटक, ४ लाख डॉलर दंड आणि पाच वर्षांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी झाली
Osho Rajneeshpuram USA
esakal
रजनीशपुरम एका ख्रिश्चन युवा शिबिर संस्थेकडे सोपवण्यात आले. आज हे ठिकाण ‘वॉशिंग्टन फॅमिली रँच’ म्हणून ओळखले जाते. आता या शहरात केवळ ३६ लोक राहात असल्याचे एका रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
Osho Rajneeshpuram USA
esakal
Fly Ash Bricks vs Red Bricks
esakal