Saisimran Ghashi
शरीरावर अचानक गाठ निर्माण होणे आणि ती वेदनारहित असणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.
मल, मूत्र किंवा जननेंद्रियातून असामान्य रक्तस्त्राव होणे गंभीर इशारा ठरू शकतो.
तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, घसा खवखवणे किंवा तोंडातील फोड लक्षात घ्या.
पचनाच्या तक्रारी, वारंवार बद्धकोष्ठता किंवा अपचन जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नये.
त्वचेवर गडद होत जाणारे मस्से, नखांजवळून रक्त येणे ही त्वचासंबंधी लक्षणे असू शकतात.
स्तनातील गाठ, त्वचेचा बदल आणि स्तनाग्रातून रक्त जाणे हे स्तन कर्करोगाचे संकेत असू शकतात.
रात्री सतत घाम येणे किंवा अकारण थकवा जाणवणे हे देखील सुरुवातीचे संकेत असू शकतात.
ही सर्व लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्करोगाचा वेळेवर निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य असतात.