Pranali Kodre
साताऱ्याच्या कोयना जंगलात लपलेला हा धबधबा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक खजिना आहे.
या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून रोमांचक ट्रेल पार करावी लागते.
पावसाळ्यात पूर्ण ताकदीने वाहणारा ओझरडे धबधबा पाहताना मन थक्क होतं.
ट्रेकिंग प्रेमींसाठी हे ठिकाण एक परिपूर्ण रोमांचकारी अनुभव देते.
धुक्याचे पदर, दाट झाडी आणि धबधब्याचा आवाज – फोटोग्राफरसाठी हे एक स्वप्नवत स्थळ!
अधूनमधून दिसणारे पक्षी, प्राणी आणि जंगलातील शांतता – एक अनोखा अनुभव!
जून ते सप्टेंबर हा काळ ओझरडे धबधबा पाहण्यासाठी सर्वात सुंदर मानला जातो.
ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुरुवातीला देखील इथलं वातावरण निसर्गसंपन्न आणि आल्हाददायक असतं.
सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरातून स्थानिकांच्या मदतीने जंगल ट्रेलने इथं पोहोचता येतं.
शांतता, सौंदर्य आणि साहस यांचा मिलाफ असलेला ओझरडे धबधबा एकदातरी अनुभवायलाच हवा!