Ankur Nikam
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात वसलेल्या पाचखेड गावाच्या जमिनीखाली हजारो वर्षांचा इतिहास दडलेला आहे. चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या या गावाला पुरातत्त्वीय संशोधनामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
पाचखेडमधील पुरातत्त्वीय अवशेषांचा संबंध प्राचीन लोहयुगाशी आहे. संशोधनातून या परिसरात इ.स.पूर्व पहिल्या सहस्रकातील मानवी वस्तीचे पुरावे समोर आले आहेत.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
उत्खननात लोखंडाच्या भट्ट्या, धातूंचे अवशेष, मातीची भांडी आणि मणी सापडले आहेत. या वस्तू तत्कालीन तंत्रज्ञान आणि जीवनशैलीची माहिती देतात.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
गोलाकार घरांचे अवशेष, जळालेल्या तांदळाचे दाणे आणि मातीची भांडी येथे आढळली आहेत. यावरून त्या काळातील शेती आणि दैनंदिन जीवनाचा अंदाज येतो.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
पाचखेडमध्ये लोखंडी वस्तू आणि कांस्य भांड्यांचे अवशेष आढळले आहेत. त्यांच्या वैज्ञानिक विश्लेषणातून तत्कालीन धातू प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळते.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
पाचखेडमध्ये लोहयुगापासून सातवाहन आणि मध्ययुगीन काळापर्यंतच्या वस्तीचे पुरावे आहेत. ब्राह्मी लिपीतील अवशेष आणि विटांची विहीरही येथे सापडली आहे.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
शेती, धातू प्रक्रिया आणि हस्तकला हे तत्कालीन जीवनाचे महत्त्वाचे भाग होते. लोखंडी साधने, मणी आणि बांगड्यांचे अवशेष या आर्थिक व्यवहारांची साक्ष देतात.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
दगडखाणी आणि मानवी हस्तक्षेपामुळे या पुरातत्त्वीय स्थळाला धोका निर्माण झाला आहे. या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन आणि योग्य दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे.
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
पाचखेडचा इतिहास म्हणजे प्राचीन शेती, धातू तंत्रज्ञान आणि मानवी वस्तीचा महत्त्वाचा पुरावा आहे. हा हजारो वर्षांचा वारसा आपण जतन करणार का?
Ancient history of Pachkhed village in Yavatmal
eSakal
History of Pune Names
eSakal