Payal Naik
मराठी अभिनय क्षेत्रात ज्यांचं नाव अदबीने आणि अभिमानाने घेतलं जातं ते म्हणजे अभिनेते अशोक सराफ.
सगळयांचे लाडके अशोक मामा म्हणून ओळखल्या अशोक सराफ यांना नुकताच पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं.
अशोक सराफ यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
८० आणि ९० च्या दशकात ते सर्वाधिक मानधन घेणारे एकमेव नट होते.
त्यांनी कधी विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. तर कधी आपल्या गंभीर आणि खलनायकी भूमिकांमधून प्रेक्षकांना चकीत केलं.
त्यांनी शाहरुख आणि सलमानसारख्या बॉलिवूडच्या खानसोबतही काम केलंय.
मराठी सिनेमाच्या या बादशाहचं एकूण नेटवर्थ किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
रिपोर्ट्स नुसार अशोक सराफ यांची एकूण संपत्ती 37 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं समजतं.
त्यांच्या कमाईच्या स्रोताबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी अभिनयाबरोबरच जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई केली असल्याचं दिसून येतं.
निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती 10 कोटी रुपयांच्या आसपास आहे. निवेदिता जोशी यांनीही पतीप्रमाणेच नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिराच्या माध्यमातून अर्थार्जन केलं आहे.
सराफ पती-पत्नीची एकूण संपत्ती 47 कोटींच्या आसपास आहे
ना जया, ना रेखा, बिग बींसाठी रात्रभर रडत बसायची 'ही' अभिनेत्री