सूरज यादव
पहलगाम हे काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे. निसर्गसौंदर्यासह ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व या ठिकाणाला आहे.
काश्मिरी भाषेतील ‘पुहेल’ म्हणजे मेंढपाळ आणि ‘गाम’ म्हणजे गाव. मेंढपाळांचं गाव म्हणून 'Puheylgam'आणि याचा अपभ्रंश होऊन ते ‘पहलगाम’ झालं.
पहलगाम म्हणजे हंगामी स्थलांतराचं केंद्र मानलं जातं. बकरवाल जमातीचे मेंढपाळ वसंत ऋतूत येथे वास्तव्य करतात. हे लोक शेळ्या-मेंढ्या चारताना निसर्गातच राहतात.
अमरनाथ गुहेकडे जाण्याच्या प्रवासात पहिला बेसकँप पहलगाम इथंच आहे. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक वातावरणही आहे.
धार्मिक असं महत्त्वही या गावाला आहे. भगवान शंकर अमरनाथ गुहेत जाताना इथंच नंदीला सोडून गेले होते. म्हणून याला बैलगाव असंही म्हटलं जातं.
इथली जीवनशैली आजही पारंपरिक अशी आहे. बकरवाल मेंढपाळ चादरी गुंडाळलेले दिसतील. ते आजही तंबूत राहतात आणि पशुपालन करून उदरनिर्वाह करतात.
लिद्दर नदीच्या काठावर हे गाव वसलंय. इथल्या निसर्गसौंदर्याची भूरळ बॉलिवूडलाही पडली. अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग इथे झालंय.