Saisimran Ghashi
पहलगाममध्ये पर्यटकांवर काल भ्याड दहशतवादी हल्ला झाला.
या हल्ल्यात देशभरातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यानंतर काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत.
या हल्ल्यात एकूण 28 जण मृत्युमुखी पडले आहेत तर अनेकजण जखमी आहेत.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे.
या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे.
या हल्ल्यात दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आलीये.
गृहमंत्री अमित शाह जखमी पर्यटकांच्या भेटीला गेले आहेत.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.