Shubham Banubakode
कराचीच्या क्लिफ्टन समुद्रकिनाऱ्याजवळ गुलाबी आणि पिवळ्या दगडांची भव्य इमारत आहे. या ऐतिहासिक वास्तूला मोहट्टा पॅलेस म्हणतात.
सेठ शिव रतन चंद्र मोहट्टा हे सिंधमधील प्रसिद्ध मारवाडी उद्योगपती होते. कराचीतील लोखंड कारखाने आणि साखर उद्योगात त्यांचा मोठा व्यवसाय होता.
मोहट्टा यांच्या पत्नी गंभीर आजाराने त्रस्त होत्या. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छ हवा त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
पत्नीच्या आरोग्यासाठी मोहट्टा यांनी क्लिफ्टन परिसरात हा भव्य महाल उभारला. १९२७ मध्ये बांधकाम पूर्ण झालं आणि वास्तू चर्चेत आली.
जयपूरहून बोलावलेल्या वास्तुविशारद अहमद हुसेन आगा यांनी महालाची रचना केली. जोधपूरचे गुलाबी आणि स्थानिक पिवळे दगड वापरून तो सजवला.
महालाच्या छतावर एक सुंदर मंदिर होतं. कुटुंबीयांना मंदिरात जाण्यासाठी महालातून गुप्त सुरंगही तयार करण्यात आली होती. पुढे ती बंद झाली.
१९४७ मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर मोहट्टा यांना कराची सोडावं लागलं. महालाच्या चाव्या व्यवस्थापकाकडे देऊन ते मुंबईला निघून गेले.
मोहट्टा यांनी महाल वाचवण्यासाठी मोहम्मद अली जिन्नांकडे विनंती केली होती. मात्र, त्यांची मागणी मान्य झाली नाही. पुढे महालात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचं कार्यालय सुरू झालं.
Hymenoplasty
esakal