पाकिस्तानातलं एकमेव हिंदू संस्थान; दबंग राजा फडकवतो भगवा झेंडा अन् मुस्लिम समुदाय करतो सुरक्षा..

Saisimran Ghashi

पाकिस्तानात एकमेव हिंदू संस्थान

भारत-पाकिस्तान फाळणीनंतरही अमरकोट हे संस्थान पाकिस्तानात हिंदू राजघराण्याच्या अधिपत्याखाली राहिले असून, हे पाकिस्तानातील एकमेव हिंदू संस्थान आहे.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

राणा चंद्र सिंह यांचा राजकीय दबदबा

अमरकोटचे राणा चंद्र सिंह हे या घराण्याचे प्रमुख होते. ते सात वेळा खासदार राहिले असून, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचे जवळचे सल्लागार होते.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

हिंदू पक्षाची स्थापना

PPP पक्षातून बाहेर पडल्यानंतर राणा चंद्र सिंह यांनी पाकिस्तान हिंदू पार्टीची स्थापना केली. या पक्षाचा झेंडा भगवा असून त्यावर 'ॐ' आणि त्रिशूल कोरलेले आहेत.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

राजकीय वारसा पुढे चालू

राणा चंद्र सिंह यांच्या मृत्यूनंतर (२००९), त्यांचा मुलगा हमीर सिंह सोढा यांनी अमरकोट संस्थानाची धुरा सांभाळली. सध्या त्यांचा मुलगा करणीसिंग सोढा हा राजा आहे.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

करणीसिंग सोढा यांचा राजकीय प्रभाव

करणीसिंग सोढा हे पाकिस्तानातील विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. ते सोशल मीडियावरही सक्रिय आहेत आणि आपलं मत मांडत असतात.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

बंदूकधारी सुरक्षारक्षक

करणीसिंग यांच्यासोबत कायम बंदूकधारी बॉडीगार्ड असतात. विशेष म्हणजे हे बॉडीगार्ड मुस्लिम समुदायातून येतात आणि त्यांच्याकडे एके-४७ रायफल्स आणि शॉटगन्स असतात.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

मुस्लिम समुदायाकडून संरक्षण

करणीसिंग यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी मुस्लिम समुदाय सांभाळतो, ही बाब अत्यंत विशेष आणि प्रेरणादायी आहे.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

इतिहासातील वंशज मान्यता

मुस्लिम समुदाय असा विश्वास ठेवतो की अमरकोटचे हे राजघराणे राजा पुरू (पोरस) यांचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांच्यावरील श्रद्धा अधिक दृढ आहे.

Pakistan Sodha Royal family history Descendants | esakal

100 वर्षांपूर्वी जोतिबा मंदिर कसं होतं? ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल चांगभलं..!

jotiba temple old photos | esakal
येथे क्लिक करा