Yashwant Kshirsagar
पाकिस्तानने भारताविरोधात अनेक युद्धे लढली आहेत अन् प्रत्येकवेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
केवळ भारतच नाही, तर जेव्हा जेव्हा पाकिस्तान इतर देशांशी सामना करतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तानी सैन्याला पराभवाला सामोरे जावे लागते.
तरीदेखील पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकारी आपल्या छातीवर अनेक पदके लावून फिरतात.
एकही युद्ध न जिंकणाऱ्या पाकिस्तानचे सैन्य अधिकारी आपल्या छातीवर इतकी पदके का लावतात? असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर चला तर मग जाणून घेऊया यामागची कहाणी
भारत-पाकिस्तान युद्ध (1947-48), (1965), भारत-पाकिस्तान युद्ध (1971) आणि कारगिल युद्धात पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आहे.
प्रत्येक देशाचे सैन्य त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांची सेवा, शौर्य इत्यादी लक्षात घेऊन पदके देते. जसं की, युद्धात सहभाग, शौर्य किंवा विशेष ऑपरेशन्समध्ये योगदान
याच कारणामुळे पराभवानंतरही पाकिस्तानमधील अनेक सैनिकांना पदके देण्यात आली आहेत.
पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार निशान-ए-हैदर आहे. हे पदक फक्त पाकिस्तान सशस्त्र दलाच्या सदस्यांना दिले जाते.