Yashwant Kshirsagar
शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर युवराज संभाजीराजे आणि अष्टप्रधान मंडळामध्ये वितुष्ट निर्माण होऊ लागले.
संभाजी महाराज हे रयतेला करसवलत देतात असा आरोप काही मंत्र्यांनी केला.
शिवरायांच्या पश्चात काहीजण अल्पवयीन राजाराम महाराजांना गादीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
या गृहकलहाला वैतागून संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेले. पण तिथे जाऊन भ्रमनिरास झाला.
संभाजीराजे डिसेंबर १६७९ मध्ये पन्हाळगडावर परत आले. पितापुत्राची हृदयस्पर्शी भेट झाली.
शंभूराजांनी पित्याच्या पायावर डोके ठेवले. शिवरायांनी जवळ बसण्यास सांगितले, पण संभाजी महाराज विनयाने दूर बसले.
शिवरायांनी स्वराज्याचे दोन विभाजन सुचवले – कर्नाटक संभाजीराजांस, महाराष्ट्र राजारामास .
शिवाजी महाराज शंभुराजांना वाटणीबद्दल म्हणाले, “तुम्ही दोघे पुत्र दोन राज्ये करणे. आपण श्रींचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो."
मंत्रिमंडळातून कुटिल कारस्थान होत होते, संभाजी महाराजांना एकटं पाडलं जात होतं तरीही त्यांनी स्वराज्याची वाटणी घेण्यास नकार दिला.
संभाजी महाराज म्हणाले, "आपणांस साहेबांचे पायाची जोड आहे, आपण दूधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन."
संभाजी महाराजांचे ते ऐतिहासिक वाक्य त्यांच्या वडिलांप्रती असलेल्या प्रेमाचे आणि स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक ठरते.
या लेखातील माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ द्वारे प्रकाशित आणि डॉ. वि. गो खोबरेकर लिखित 'महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड (भाग १) शिवकाल ( १६३० ते १७०७ इ. )' या पुस्तकात देण्यात आली आहे.