पाकिस्तानची ‘फतेह’ मिसाईल म्हणजे नक्की काय?

Aarti Badade

‘फतेह’ मिसाईल

‘फतेह’ ही कमी अंतरावर मारा करणारी घातक मिसाईल असून युद्धाच्या तयारीत पाकिस्तानचे खास अस्त्र आहे.

Pakistan Fateh missile | Sakal

फतेह’ म्हणजे विजय!

फतेह या अरबी शब्दाचा अर्थ – विजय असून या नावातूनच पाकिस्तानने विजयाचा इशारा दिला आहे.

Pakistan Fateh missile | sakal

काय आहे फतेह मिसाईल?

ही एक शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल असून आर्मीच्या फ्रंटलाइनसाठी याचा वापर होतो. ती जवळच्या लक्ष्यांवर अचूक मारा करते .

Pakistan Fateh missile | Sakal

तांत्रिक वैशिष्ट्ये

या मिसाईलची लांबी: 8 ते 9 मीटर असून वजन: सुमारे 2,500 ते 3,000 किलो तर पेलोड क्षमता: 500 किलोपर्यंत आहे.

Pakistan Fateh missile | Sakal

कोणते शस्त्र घेऊन जाते?

ही मिसाईल उच्च स्फोटक, क्लस्टर बॉम्ब, थर्मोबारिक ची वाहक आहे.

Pakistan Fateh missile | Sakal

किती आहे रेंज?

फतेह-1: 140 ते 150 किमी रेंज आहेत तर, फतेह-2: 250 किमीपर्यंत रेंज आहे. GPS आणि INS मार्गदर्शन प्रणाली.

Pakistan Fateh missile | Sakal

पाकिस्तानकडे किती युनिट्स आहेत?

सध्या पाकिस्तानकडे अंदाजे 50 ते 100 युनिट्स मिसाईल आहेत. त्याचे उत्पादन अजूनही सुरू आहे.

Pakistan Fateh missile | Sakal

कधी आणि कशी तयार झाली?

हे क्षेपणास्त्र 2013 साली NDC आणि NESCOM यांनी विकसित केले असून त्यासाठी चीनने तांत्रिक मदत केली.

Pakistan Fateh missile | Sakal

का मानली जाते घातक?

अचूक मारा करण्याची क्षमता,कमी उंचीवर उडणं – रडार टाळता येतो,स्वदेशी निर्मिती – आत्मनिर्भरतेचा दावा म्हणून घातक मानली जाते.

Pakistan Fateh missile | Sakal

पण काही मर्यादा देखील!

फक्त 150 किमी पर्यंत मर्यादित,खोल शत्रू प्रदेशात पोहोचू शकत नाही,आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते ताकद मर्यादित आहे.

Pakistan Fateh missile | Sakal

डार्क टुरिझम म्हणजे काय? पुण्यातल्या गूढ ठिकाणाचा समावेश

Dark Tourism | Sakal
येथे क्लिक करा