Aarti Badade
नाश्त्याचे अनेक प्रकार आहेत. पण भारत-पाकमध्ये 'नल्ली निहारी'सारखा चविष्ट आणि पौष्टिक मांसाहारी नाश्ता आवडीने केला जातो!
निहारी हा एक मांसाहारी स्टू आहे. त्याला विशिष्ट चव येण्यासाठी तो खूप वेळ आणि संयमाने शिजवला जातो.
आजकाल निहारीमध्ये नल्ली (हाडांमधील मज्जा) आणि मगज (मेंदू) यांचाही वापर केला जातो. यामुळे त्याची चव आणखी वाढते!
निहारीला एक खास आणि aromatic चव देण्यासाठी त्यात गरम मसाला आणि जिऱ्यांसारखे तब्बल ५० हून अधिक मसाले वापरले जातात!
'निहारी' हा शब्द मूळच्या अरबी भाषेतील 'नहार' या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ 'सकाळ' असा होतो.
काही लोक दिल्लीतील जामिया मशिदीच्या परिसराला त्याचे जन्मस्थान मानतात, तर काहीजण अवधच्या शाही किचनमधील हा खास पदार्थ असल्याचे सांगतात.
जेव्हा निहारी नवाबांच्या शाही दरबारात पोहोचली, तेव्हा हकीमांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यात मेथी आणि हळदीसारखे औषधी घटक मिसळले.
भारताच्या फाळणीनंतर निहारीची चव पाकिस्तानातही पोहोचली आणि आज हा तिथल्या प्रमुख आणि लोकप्रिय मांसाहारी पदार्थांपैकी एक आहे.
बांगलादेशातील ढाका आणि चट्टग्राम यांसारख्या शहरांमध्येही निहारी एक लोकप्रिय आणि आवडीचा नाश्ता आहे.
पूर्वी कामगारांना निहारी खायला देऊन त्यांच्याकडून अधिक काम करून घेत असत. त्यामुळे हा कामगारांसाठी सकाळचा नाश्ता बनला!