सकाळ वृत्तसेवा
१९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी बसने लाहोरला गेले. नवाज शरीफ यांच्यासोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला.
शांततेच्या वेळीच पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरीसाठी लष्कर पाठवण्याचा कट रचला. मुशर्रफ आणि नवाज शरीफ दोघं वेगवेगळं नाटक करत होते.
नेहरूंप्रमाणेच वाजपेयींचीही शांततेच्या नावे फसवणूक झाली. चीनने नेहरूंना फसवलं, तसंच पाकिस्तानने वाजपेयींना!
भारत आणि पाकिस्तान दोघंही अणुबॉम्बधारक देश. युद्धाची तीव्रता आणि अणुयुद्धाची भीती जगभर पसरली.
ब्रूस रायडेल यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेला पाकिस्तानचा खरा चेहरा माहित होता. बिल क्लिंटन यांनी चर्चा सुरू केली.
१७,००० फूट उंचीवर भारतीय सैन्याने कठीण लढा दिला. पाकिस्तानला मागे हटावं लागलं.
शरीफ अमेरिकेला पोहोचले. क्लिंटन यांच्याकडे मदतीची याचना केली. पण क्लिंटन ठाम होते – माघार घ्या, मगच चर्चा.
क्लिंटन यांनी शरीफ यांना सुनावलं – पाकिस्तान अणुबॉम्बचा विचार करत होता. शरीफ गोंधळले, नकार देत राहिले.
शेवटी शरीफ यांनी अमेरिकेच्या कागदावर सही करून माघार घेतली. अणुयुद्ध टळलं, पण पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली.
पाकिस्तानचा कारगिल डाव बारगळला. भारताचं धैर्य आणि क्लिंटन यांचा ठामपणा यामुळे अणुबॉम्बचं संकट टळलं.