भारतातील सर्वात महाग रेल्वे प्रवास ! एका तिकिटाच्या किमतीत खरेदी कराल बंगला

Yashwant Kshirsagar

रेल्वेची दुसरी बाजू

भारतीय रेल्वेच्या प्रवासाचे नाव काढले तर गर्दी आणि धक्काबुक्की आठवते, पण रेल्वेमध्ये ‘पॅलेस ऑन व्हील्स’ सारखी आलिशान ट्रेन आहे, जी लक्झरीची परिभाषाच बदलते.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

राजेशाही स्वागत

या ट्रेनमध्ये प्रवेश करताच रेड कार्पेट, फुलांचा वर्षाव आणि पारंपरिक स्वागताने प्रवाशांना महाराजांसारखी वागणूक दिली जाते.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

फिरता महाल

गाडीतील सूट्समध्ये लाकडी नक्षीकाम, सोन्याचा मुलामा आणि राजवाड्यासारखी सजावट यामूळे जणू मुघल सम्राटांच्या महालात प्रवेश केल्याचा अनुभव येतो.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

डेस्टिनेशन वेडिंग

आता या गाडीत लग्नसोहळेही आयोजित करता येतात राजस्थानची सफर आणि विवाह एकाच वेळी होऊ शकतात.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

५ कोटींचा मेकओव्हर

गाडीच्या नूतनीकरणासाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मेक्सिकन कापड, स्पा, गीझर्ससह अत्याधुनिक सुविधा ट्रेनमध्ये आहेत.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

उन्हाळ्यातही शाही प्रवास

४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यातही गाडी धावत आहे, प्रवाशांसाठी खास थंड पेयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

राजस्थानी मेजवानी

उदयपूरची थंडाई, जयपूरची कुल्फी आणि जैसलमेरमध्ये ग्लूकॉन डी तसेच वेगवेगळ्या स्वादिष्ट भोजनांचा आनंद या ट्रेनच्या प्रवासात घेता येणार आहे.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

तिकीट दर किती?

या ट्रेनच्या एका केबिनचे भाडे १० लाख ते २३ लाख रुपये आहे. या किंमतीत शहरापासून जवळ छोटा बंगला खरेदी करता येईल!

Palace on Wheels luxury train India

|

esakal

रॉयल सफर

दिल्ली, आग्रा आणि राजस्थानातील प्रमुख ठिकाणांचा ७ रात्री-८ दिवसांची ही रॉयल सफर या ट्रेनने करता येते.

Palace on Wheels luxury train India

|

esakal

फुल बुकिंग

महाग असूनही सर्व सीट्स बुक परदेशी पर्यटक आणि अनिवासी भारतीय आधीच आरक्षण करतात. हा अनुभव म्हणजे आयुष्यातील एकदा तरी जगायचं स्वप्न आहे!

Palace on Wheels luxury train India

|

esakal

राजेशाही जीवनशैली

‘पॅलेस ऑन व्हील्स’ म्हणजे केवळ प्रवास नाही, तर राजेशाही जीवनशैलीचा जिवंत अनुभव आहे!

Palace on Wheels luxury train India

|

esakal

आयुष्यातील नैराश्य दूर करुन यशस्वी व्हायचंय ? गरूडाचे 'हे' ७ गुण येतील कामी

Motivational Life Tips

|

esakal

येथे क्लिक करा