पालक न आवडणारेही खातील! असा बनवा कुरकुरीत पालक पनीर डोसा

Aarti Badade

हेल्दी आणि टेस्टी पर्याय

रोज तोच तोच नाश्ता खाण्यापेक्षा पालकाचे गुणधर्म आणि पनीरची चव असलेला हा डोसा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

Palak Paneer Dosa

|

Sakal

लागणारे मुख्य साहित्य

तांदूळ पिठी, रवा, दही, अर्धी जुडी पालक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पनीर आणि चवीनुसार मीठ.

Palak Paneer Dosa

|

Sakal

पिठाची तयारी कशी करावी?

तांदूळ पिठी, रवा आणि दही ६-७ तास आधी भिजवून ठेवा, ज्यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो.

Palak Paneer Dosa

|

sakal

पालकाचे मिश्रण तयार करा

पालक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि हे मिश्रण तयार पिठात एकत्र करा.

Palak Paneer Dosa

|

sakal

असा बनवा गरमागरम डोसा

तव्यावर तेल सोडून डोसा पसरवा आणि तो तयार झाल्यावर अर्ध्या भागावर किसलेले पनीर घालून घडी घाला.

Palak Paneer Dosa

|

Sakal

सोबतीला बनवा 'ही' चटणी

डोसा अधिक चवदार लागण्यासाठी कांदा, टोमॅटो, उडीद डाळ आणि सुक्या लाल मिरच्यांची विशेष चटणी बनवा.

Palak Paneer Dosa

|

Sakal

चटणीची सोपी कृती

धने, जिरे, डाळ आणि कांदा-टोमॅटो परतून घ्या, थंड झाल्यावर वाटून त्याला मोहरीची खमंग फोडणी द्या.

आरोग्यासाठी फायदेशीर नाश्ता

पालकातील फायबर पचन सुधारते, तर पनीरमुळे शरीराला प्रोटीन मिळते; आजच हा नाश्ता ट्राय करा!

Palak Paneer Dosa

|

Sakal

कांदाभजीला द्या सुट्टी! घरीच बनवा हॉटेलसारखी कुरकुरीत कोळंबी भजी

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

येथे क्लिक करा