महिनाभर दररोज आलं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?

Anushka Tapshalkar

सूज कमी करणे

आलं शरीरातील सूज लवकर कमी करते, कारण त्यात सूजनविरोधी गुणधर्म असतात.

Swelling | sakal

वातरोग कमी होणे

तुम्हाला दररोज मळमळ होते का? दररोज आलं खाल्ल्याने मळमळ कमी होईल. विशेषतः गर्भवती महिलांना आणि कीमोथेरपी घेत असलेल्या लोकांना याचे फायदे होऊ शकतात.

Nausea | sakal

मांसपेशीतील वेदना कमी होणे

मांसपेशींच्या वेदना किंवा हाताच्या किंवा पायाच्या वेदना आसतील तर आलं खाल्ल्याने या वेदनांवर चांगला प्रभाव पडतो.

Muscle soreness | sakal

पचन सुधारणे

आलं नियमितपणे खाल्ल्याने आपल्या पचन क्रियेवर चांगला प्रभाव पडतो. नियमितपणे बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आल्याचे सेवन करणे उपयोगी ठरू शकते.

Digestion | sakal

महिलांना मासिक पाळीच्या वेदना कमी होणे

महिन्याच्या त्या दिवसात सतत वेदना होत असतील तर दररोज आलं खाल्ल्याने या वेदना कमी होऊ शकतात. आलं हे पेनकिलर्ससारखे काम करते आणि त्वरित पोटाच्या वेदना कमी करू शकते.

Menstrual Cramps | sakal

कोलेस्टेरॉल कमी करणे

आलं दररोज खाल्ल्याने शरीरातील "वाईट" कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. आल्यातील घटक रक्तातील ट्रायग्लिसेराइड्स कमी करतात.

Lowers Cholestrol | sakal

इम्युन सिस्टम बूस्ट करणे

आल्यातील सूजनविरोधी गुणधर्म इम्युन सिस्टमला बळकट करतात. आधीच सर्दी किंवा इन्फेक्शन झाले असेल तर आलं लवकर रिकव्हरी करण्यास मदत करू शकते.

Boosts Immune System | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Consult Doctor | sakal

PCOS/PCOD मुळे वजन कमी होत नाहीये? मग 'हे' पदार्थ खाणं आजच बंद करा

PCOS/PCOD Weight Loss Blockers | sakal
आणखी वाचा