Sandip Kapde
पंचायत-4 या वेबसिरीजमधील ग्रामपंचायत फुलेरा हे नाव सध्या चर्चेत आहे.
फुलेरा गावाचा उल्लेख प्रत्येकजण आपापल्या संभाषणात किंवा गमतीने नक्कीच करत असतो.
लोकांना केवळ वेब सीरिजच नाही तर शूटिंग लोकेशनही जास्त आवडते.
राजस्थानमध्ये फुलेरा नावाचे खरे गाव आहे, पण प्रत्यक्षात या चित्रपटातील बहुतांश दृश्ये मध्य प्रदेशातील सिहोरच्या महोदिया गावात शूट करण्यात आली आहेत.
ही वेबसिरीज पाहिल्यानंतर फुलेरा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेली लोकेशन पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत.
चला तर मग जाणून घेऊया पंचायत 3 च्या ऑनस्क्रीन गाव, फुलेरा म्हणजेच मध्य प्रदेशातील महोदिया गावाशी संबंधित मनोरंजक गोष्टी.
महोदिया पंचायत, मध्य प्रदेशच्या मध्यभागी, भोपाळपासून 48 किमी आणि इंदूरपासून 153 किमी अंतरावर आहे.
पंचायत मालिकेत आल्यानंतर हे गाव चर्चेत आले.
प्रधानजींचे घर असो, पाण्याची टाकी असो, पंचायत कार्यालय असो, पूल असो किंवा मंदिर असो
महोदिया गावात या सगळ्या गोष्टी खऱ्या आयुष्यात पाहायला मिळतात. ही सर्व ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे आहेत.
जर तुम्ही पंचायत 3 पाहिल्यानंतर महोदिया येथे येण्याचा विचार करत असाल तर येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे.
येथे तुम्ही भगवान शंकराच्या दर्शनासाठी जाऊ शकता. मंदिराभोवतीचे नैसर्गिक दृश्य तुमचा सर्व थकवा दूर करेल.