सूरज यादव
पंचायत ४ वेब सिरीज नुकतीच रीलीज झाली. यात रिंकीचं पात्र साकारणाऱ्या सांविकाने वेबसिरीजमधील सचिवजींसोबतच्या Kissing सीनबद्दल मोठा खुलासा केलाय.
पंचायत ४ सीजनमध्ये रिंकीची भूमिका साकारलेल्या सांविकाने सचीवजींसोबत किसिंग सीनला नकार दिल्याचं सांगितलंय. यामुळे सीरिजमध्ये दिग्दर्शकांना सीन बदलावा लागला.
एका मुलाखतीत सांविकाने सांगितलं की, पंचायत ४ मध्ये सचिवजींसोबत एक किसिंग सीन होता. पण त्याबाबत दिग्दर्शकांनी सांगताच यावर विचार करायला २ दिवसांचा वेळ घेतला आणि शेवटी नकार दिला.
पंचायत ही सिरीज सर्वच वयोगटातल्या लोकांच्या पसंतीस उतरलीय. याचा प्रेक्षकवर्ग वेगवेगळ्या वयोगटातला आहे. त्यामुळे यातलं दृश्य चित्रित करताना ते बिभत्स वाटू नये याकडेच टीमचा कल होता.
पंचायतच्या टीमने सांविकाने दिलेल्या नकाराचा आदर करत सीन बदलण्याचा निर्णय घेतला. सांविकाने आपण किसिंग सीनसाठी अनकम्फर्टेबल असल्याचं सांगितलं होतं.
पंचायतमध्ये मूळच्या किसिंगसीनबद्दल कुटुंबियांना काहीच माहिती नाही असंही सांविका म्हणालीय. घरचे मला समजून घेतात असंही सांविकाने मुलाखतीत म्हटलंय.
पंचायत ४ मध्ये एक सीन होता ज्यात सचिवजी आणि रिंकी यांच्यात किस दाखवला जाणार होता. दोघे एका गाडीत असतात आणि तिथे रिंकी पडते, त्यावेळी दोघांमध्ये किस होतो असं ते दृश्य होतं.
रिंकीने नकार दिल्यानंतर शूटिंगवेळी ते दृश्य हटवण्यात आलं. त्याऐवजी टाकीवरचा सीन सीरिजमध्ये घेतला गेला असंही सांविकाने सांगितलंय.