पंचायतमधील फुलेराच्या विकासची बायको खुशबू गाँव की छोरी नाही तर..खतरनाक फोटो पाहा

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजकाल पंचायत 3 वेब सिरीजची चर्चा सर्वत्र सुरू आहे. जरी प्रधान जी, सचीव जी पासून प्रल्हाद चा पर्यंतच्या सर्वच पात्रांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असले तरी आजकाल या शोमधील प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तिरेखाची चर्चा होत आहे.

यातीलच एक पात्र म्हणजे फुलेरा ग्रामपंचायत सहाय्यक विकास शुक्ला यांची पत्नी खुशबू.

जिने पंचायत वेब सीरिजमध्ये एका साध्या खेड्यातील मुलीची भूमिका साकारली होती, पण तिचा खऱ्या आयुष्यातला ग्लॅमरस लूक पाहून तुम्ही चक्रावाल.

फुलेरा ग्रामपंचायत सहाय्यक विकास शुक्ला उर्फ ​​चंदन राय यांची पत्नी खुशबू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

खुशबूच्या नावाचा उल्लेख पंचायतच्या पहिल्या सीझनमध्ये झाला होता, मात्र पंचायतच्या तिसऱ्या सीझनमध्ये तिचे पात्र पाहायला मिळाले.

विकास शुक्ला यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव तृप्ती साहू आहे. तृप्तीने पंचायत 3 मध्ये कमी स्क्रीन स्पेस शेअर केली असेल, पण तिला जो काही वेळ मिळाला, तिने तिच्या पात्राला जीवदान दिले.

एक साधी गावठी मुलगी दिसणारी तृप्ती खऱ्या आयुष्यात खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. खुशबू म्हणजेच तृप्ती साहूचे जबरदस्त फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विकास आणि खुशबू म्हणजेच चंदन राय आणि तृप्ती साहू यांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे.

या दोघांनी गुलमोहर या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघेही शर्मिला टागोरसोबत दिसले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तृप्ती याआधी २०२३ मध्ये 'तववाई', 'शर्मा जी की बेटी' आणि गुलमोहर सारख्या अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली आहे.

तिने तिचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea