Sandip Kapde
पांडवगड किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णा नदीच्या उत्तरेकडील महादेव रांगेवर वसलेला आहे.
Pandavgad
esakal
हा किल्ला सह्याद्रीच्या उपरांगेतील उंच शिखरावर बांधलेला असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून ४१७० फूट आहे.
Pandavgad
esakal
शिलाहार राजा भोज यांनी इसवी सन ११७८ ते ११९३ या काळात पांडवगड बांधल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात.
Pandavgad
esakal
काळानुसार हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला आणि काही काळ त्यांनी त्याचा वापर केला.
Pandavgad
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ साली हा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात दाखल केला.
Pandavgad
esakal
शिवाजी महाराजांनी या गडाचे गडकरी म्हणून सरनौबत पिलाजी गोळे यांची नियुक्ती केली होती.
Pandavgad
esakal
सन १७०१ मध्ये मोगलांनी हा किल्ला हस्तगत केला, परंतु १७०९ मध्ये तो पुन्हा स्वराज्यात परत आला.
Pandavgad
esakal
१८१८ मध्ये मेजर थॅचरने पांडवगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आणला आणि त्यानंतर तो कंपनी सरकारकडे गेला.
Pandavgad
esakal
पांडवगडावर पोहोचण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. मेणवली मार्गे खडतर चढाईचा आणि धावडी गावातून जाणारा सोपा मार्ग.
Pandavgad
esakal
गडावर हनुमंताचे उघड्यावर असलेले मंदिर आणि गडदेवी पांडवजाईचे छोटेसे मंदिर पाहायला मिळते.
Pandavgad
esakal
गडावरून धोम धरणाचा जलाशय, कमलगड, महाबळेश्वर-पाचगणी पठार आणि वाई शहराचे निसर्गरम्य दृश्य दिसते.
Pandavgad
esakal
पांडवगड हा इतिहास, निसर्ग आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला दुर्ग आजही अभिमानाने उभा आहे.
Pandavgad
esakal
Bhushangad Fort
esakal