Aarti Badade
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरचा इतिहास १,५०० वर्षांहून अधिक जुना असल्याचे ऐतिहासिक नोंदींवरून दिसून येते.
Pandharpur
Sakal
ऐतिहासिक माहितीनुसार, इ.स. ५१६ मधील ताम्रपटात पंढरपूरचा उल्लेख ‘पांडरंगपल्ली’ या नावाने आढळतो.
Pandharpur
Sakal
प्राचीन शिलालेख आणि ताम्रपटांमध्ये पंढरपूरचा ‘पांडरंगपल्ली’ तसेच ‘पंडरगे’ अशा नावांनी उल्लेख आढळतो.
Pandharpur
Sakal
पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराचे महत्त्व अनेक शतकांपासून कायम असून, हे मंदिर वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.
Pandharpur
Sakal
उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, इ.स. ११८९ मधील शिलालेख पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
Pandharpur
Sakal
पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी ही महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, या परंपरेला अनेक शतकांचा इतिहास आहे.
Pandharpur
Sakal
चंद्रभागेच्या तीरावर वसलेले पंढरपूर आजही विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असून, प्राचीन इतिहास आणि वारकरी परंपरेमुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Pandharpur
Sakal
Malhargad Fort
esakal