संतोष कानडे
वारीत एक खास परंपरा आहे – ती म्हणजे 'धावा'. याचा अर्थ धावणे, पण त्यामागे एक खूप भावनिक कथा आहे.
एकदा संत तुकाराम महाराज वारी करत होते. तेव्हा ते वेळापूर येथे थांबले.
वेळापूरच्या टेकडीवरून त्यांना पंढरपूरच्या मंदिराचा कळस दिसला. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्यांना सहन झाली नाही.
आणि मग तुकाराम महाराज वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत धावत गेले. हे त्यांनी केवळ भक्तीपोटी केले.
आजही ही परंपरा 'धावा' म्हणून सुरू आहे. पालखी वेळापूरला पोहोचली की, सर्व वारकरी धावत सुटतात.
तुकाराम महाराजांच्या 'सिंचन करता मूळ…' या अभंगाच्या शेवटी, ते म्हणतात: 'तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ।।'
अभंग झाल्यावर दिंडी धावायला सुरुवात करते. उतारावरून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी धावतात.
म्हातारे वारकरीही मागे राहत नाहीत. ते हळूहळू का होईना, पण तेही धावतात. त्यांची श्रद्धा खूप मोठी असते!
'धावा' म्हणजे केवळ चालणे नाही. ती पंढरपूरची तीव्र ओढ आहे. तुकाराम महाराजांच्या पाऊलखुणा आजही वारीत अनुभवता येतात.