संतोष कानडे
पंढरीच्या पांडुरंगाच्या पोशाख पूजेचं अनन्यासाधारण महत्व आहे. सकाळी पोशख परिधान केल्यानंतर दुपारी तो बदलला जातो.
दिवसभर वापरुन मलीन झालेली वस्त्रे दुपारी साडेचार वाजता बदलली जातात. देवाला स्वच्छ वस्त्रे परिधान केली जातात.
सणासुदीला उंची, भरजरी, रेशमी वस्त्रे, त्यावर खजिन्यातील रत्नजडित, सुवर्णालंकार देवाला घालण्यात येतात.
पाद, मुखप्रक्षालन करुन हार, फुले व तुळशी वाहून लाडवाचा नैवेद्य अर्पितात.
ऋतुकालपरत्वे धुपारती वा शयनारती आदीच्या वेळेत बदल होतो. तसेच वस्त्रप्रावरनेही बदलली जातात.
रात्री रजई पांघरली जाते तर उन्हाळ्यात चंदनाची उटी करण्यात येते. नैवेद्यामध्ये आमरस, बासुंदी, श्रीखंड असा बदल होतो.
प्रत्येक पूजेवेळी उक्त वेदमंत्री, आरत्या स्तोत्रे म्हटले जाते. सकाळी बाळरुपात दिसणारा परमात्मा घडी घडी रुप बदलत तरुण, प्रौढ होत रात्री वयोवृद्धासारखा भासतो.
विठुरायाला उन्हाळ्यात चंदनाची उटी लावतात. रंगपंचमीच्या दिवशी विठुरायाला पांढरे वस्त्रे परिधान केले जाते.