वारीस निघालात? हे आजार घेरू शकतात, वाचण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या!

Monika Shinde

वारीचा ऋतुसंधी काळ

ज्येष्ठ वद्य ते आषाढ शुद्ध उन्हाळ्यातून पावसाळ्यात होणारी वाटचाल शरीरावर ताण आणते. भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते.

वारकऱ्यांच्या पोटात 'आग' का होते?

सतत बदलते पाणी, असमाधानकारक आहार, गोड पदार्थ, अतिपाणी सेवन – यामुळे गॅसेस, अजीर्ण, आम्लपित्त होऊ शकते.

२५ किमी चालणं

दररोज चालायची सवय नसलेल्यांना पाय दुखणं, सांधे जड होणं, थकवा हे सामान्य आहे. विशेषतः आळंदी-पुणे-सासवड टप्पे अधिक कठीण वाटतात.

उष्णतेचे घातक परिणाम

स्वयंपाक, रात्रपाळी आणि सतत ऊन यामुळे शरीरात उष्णता वाढते. तोंडातील फोड, रांजणवाडी, रक्तस्रावासारखे त्रास संभवतात.

'जनपदोध्वंस’

डेंगी, मलेरिया, स्वाईन फ्लू, टीबी यांसारख्या रोगांचा धोका वाढतो. वाढलेली गर्दी, कीटक, वास आणि अस्वच्छता हे याला कारणीभूत ठरतात.

दमट आणि अस्वच्छ जागा

ओलसर अंथरुण, घाम, घाण पाणी आणि शेअर्ड कपड्यांमुळे खाज, फोड, लसू, त्वचारोग वाढतात.

उघड्यावर शौच

अस्वच्छतेतून येणाऱ्या माश्या, कीटक व्याधी पसरवतात. दुर्गंधी आणि अपुरा ड्रेनेजही गंभीर समस्या निर्माण करतात.

अपघातांचा धोका देखील आहे

वाहने, इलेक्ट्रिक शॉक, सिलिंडर-चूल अपघात आणि चुकून पडणे यामुळे मोठी इजा होऊ शकते.

स्वतःची आणि इतरांची काळजी

स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. नियमित औषधे, स्वच्छ आहार-पाणी, पुरेशी विश्रांती, भौतिक सुरक्षितता पाळा.

रक्तदान कोणी करू नये?

येथे क्लिक करा...